बऱ्याच दिवसांपासून वाटत होतं कि आपणही काहीतरी लिखाण कराव. मनात उमटणारे असंख्य विचार तरंग कुठेतरी कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करावा, पण म्हणावा असा योग काही येत नव्हता! आज मनाचा हिय्या करून लिहायला बसलो, पण परत मनात विचार आला कि काय लिहू? आणि कुणासाठी लिहू? रिकाम्या घरामधे एकटाच बसून विचार करत असताना, एक जुनी गोष्ट आठवली, ते म्हणतात ना कि "भिंतीनासुद्धा कान असतात". तेव्हा म्हटल या भिंतीनाच का सांगू नये आपल्या मनातील गोष्टी? निदान त्या शांतपणे ऐकतील तरी.........
Monday, May 24, 2010
जखम...
जखमेत त्या सुगंधी, अजुनि थोडी ओल आहे.
तू हसत हसत दिधला, तो घाव खोल आहे.
प्रेमाशिवाय जगलो, दीर्घायुषी होऊनि...
जगणे कसे म्हणु त्या? जे मातीमोल आहे.
जुळल्या मनामनांच्या, तारा अशा कि आता,
कुठली तुझी नि माझी? इतकाच घोळ आहे.
आरंभिलो जेथुनि, तेथेच पोचलो पुन्हा,
मज सांगती चंद्र-तारे, ही पृथ्वीच गोल आहे.
भेटायचो तुला मी, ज्या धुंद सागरापाशी...
तो बोलका किनारा, आता अबोल आहे.
Subscribe to:
Posts (Atom)